Up, bihar: यूपी, बिहारमधील कामगारांमुळे राज्यात 90 टक्के गुन्हे!- मुख्यमंत्र्यांची टीका



ब्युरो टीम: राज्यातील 90 टक्के गुह्यांना यूपी, बिहार आणि अन्य राज्यांतून आलेले कामगार जबाबदार आहेत,असे म्हणत  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परप्रांतीयांवर जोरदार निशाणा साधला आहे. कामगार दिनानिमित्त सोमवारी पणजी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक मजुरासाठी श्रमिक कार्डची योजना आणली आहे. कंत्राटदारांनी आपल्या कामगारांकडे श्रमिक कार्ड असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून गोव्यात येणाऱया प्रत्येक परप्रांतीय कामगाराची ओळख पटवणे सोपे होणार आहे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

परप्रांतीय कामगारांची इत्यंभूत माहिती जमा करण्यासाठी गोवा सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. त्यासाठी दोन खासगी संघटनांसोबत सरकारने हातमिळवणी केली आहे. कामगारांकडून त्याचे ओळखपत्र, बायोमेट्रिक अपडेट घेण्यात येऊन त्यांना श्रमिक कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या गुह्यात परराज्यातील मजुराचा सहभाग असेल तर त्याचा ठावठिकाणा शोधण्यास मदत होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने