Wrestler Protest: भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई करणार; ४५ दिवसाची दिली मुदत ; जागतिक संघटनेचा भारताला इशारा



ब्युरो टीम: भारतात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल आता जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी नव्या पार्लिमेंटसमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आज त्यांनी त्यांची सर्व आंतरराष्ट्रीय पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलक पैलवानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्वांचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटताना दिसत आहेत.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतातील परिस्थितीबद्दल अनेक महिन्यांपासून मोठ्या चिंतेने पाठपुरावा केला आहे. जेथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या अध्यक्षांकडून गैरवर्तन आणि छळ केल्याच्या आरोपांबद्दल निषेध करत आहेत. पण, या शेवटच्या दिवसातील घटना अधिक चिंताजनक दिसली. कुस्तीपटूंना पोलिसांनी अटक करून तात्पुरते ताब्यात घेतले. एक महिन्याहून अधिक काळ ते ज्या ठिकाणी आंदोलन करत होते ती जागाही अधिकाऱ्यांनी मोकळी केली आहे. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा जागतिक संघटना ठामपणे निषेध करते. आतापर्यंतच्या तपासाचे निष्पन्न न झाल्याबद्दल ते निराशा व्यक्त करते. जागतिक संघटनेशी संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन करते.

या प्रकराबाबत चौकशी करण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाची प्रभारी समिती यांना संघटनेच्या निवडणूकीसंदर्भात माहिती देण्याची आम्ही विनंती करतोय त्यासाठी आम्ही 45 दिवसांची मुदत त्यांना देत आहोत, या मुदतीत निवडणूक न झाल्या, भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली जाईल आणि भारतीय खेळाडूंना तिरंग्याखाली सहभाग घेता येणार नाही. त्यांना तटस्थ झेंड्याखाली खेळावे लागेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने