yashavantraoholkar: महाराजा यशवंतराव होळकर पुणे ते इंदौर शौर्ययात्रा संपन्न




विक्रम  बनकर, नगर - इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभुत करणार्‍या शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर आयोजित करण्यात आले असून, या शोर्य यात्रेनिमित्त नगरला 8 मे 2023 रोजी समाज प्रबो

ही शौर्ययात्रा केडगांव येथे आल्यानंतर बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास स्वप्नीलराजे होळकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शौर्य यात्रेचे स्वागत केले त्यानंतर यात्रा स्टेट बँक चौक, डिएसपी चौक, प्रेमदान चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक तसेच भिस्तबाग या ठिकाणी समाज बांधवांच्यावतीने या शौर्ययात्रेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन पायी मिरवणुकीने जाऊन गंगा लॉन येथे मुक्काम करण्यात आला.

या शौर्य यात्रेच्या मार्गवर धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य, घोडे, ध्वजधारी पादचारी असा दिमाखदार सोहळा साजरा केला. या शौर्ययात्रेच्या निमित्ताने , केडगांव ते गंगा लॉन या मार्गावर विविध ठिकाणी स्वागत झाले.

यावेळी स्वप्नील राजे होळकर (इंदोर) राजेंद्र पाचे, अशोक भोजने, वसंत दातीर, राजेंद्र तागड, निवृत्ती दातीर, प्रा.शरद दलपे, चंद्रकांत तागड, निशांत दातीर, ज्ञानदेव घोडके, ज्ञानेश्वर भिसे, ऋषी ढवण,  अशोक भिटे, खंडू कजबे, अंबदाास पाचे, ज्ञानदेव तागड आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

video- 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने