ब्युरो टीम: आयपीएल मध्ये
सर्वात जास्त विकेट्सचा विक्रम हा ड्वेन
ब्राव्हो याच्या नावावर होता. मात्र चहलने बरोबरी केली आहे. आता चहल आणि ब्राव्हो
या दोघांच्या नावावर प्रत्येकी 183 विकेट्सची नोंद आहे.
चहलचा आयपीएल रेकॉर्ड
जबरदस्त आहे. चहलने 142 सामन्यांमध्ये 8.08 इकॉनॉमी रेटने आणि 19.41 च्या
एव्हरेजने 183 विकेट्स घेतल्या आहेत. चहल राजस्थान रॉयल्स आधी 2014-2021 या
कालावधीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या गोटात होता. चहलने आरसीबीसाठी 113
मॅचमध्ये 139 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे चहल आरसीबीसाठी सर्वाधिक
विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.तसेच राजस्थान टीममध्ये 2022 पासून ते आतापर्यंत चहलने
44 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वात जास्त
विकेट्स घेण्याच्या यादीत ड्वेन ब्राव्हो हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. तर उर्वरित
4 हे फिरकीपटू आहेत.
युझवेंद्र चहल -183* विकेट्स
ड्वेन ब्राव्हो - 183
विकेट्स
पीयूष चावला - 174
विकेट्स
अमित मिश्रा - 172
विकेट्स
आर अश्विन - 171 विकेट्स
चलाख चहल
चहलच्या नावावर असाही
रेकॉर्ड
टिप्पणी पोस्ट करा