वेस्ट इंडिजसोबतची सिरीज पुढील महिन्याच्या 12 तारखेपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये दोन टेस्ट सामन्यांचा समावेश आहे. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 सुरु होणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळणार असल्याची माहिती मिळतेय. 


वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरीजनंतर तो लंडनला रवाना होणार आहे. अजिंक्य रहाणे 2019 साली हॅम्पशायर टीमचा भाग होता आणि आता तो लीसेस्टरशायरकडून खेळणार आहे


काय म्हणाला रहाणे?


अजिंक्य रहाणे म्हणाला की  “आगामी सिझनसाठी लीसेस्टरशायरमध्ये सामील होताना मला खरोखर आनंद झालाय. मी माझ्या नवीन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी आणि लीसेस्टरचं शहर एक्सप्लोर करण्यासाठी वाट पाहतोय.”


भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "वेस्ट इंडिजमधील दोन टेस्ट सामन्यांनंतर अजिंक्य ( Ajinkya Rahane ) थेट इंग्लंडला रवाना होणार आहे. उर्वरित सिझनसाठी लीसेस्टरशायरमध्ये सामील होणार आहे. तो ऑगस्टमध्ये रॉयल लंडन चषक आणि सप्टेंबरमध्ये 4 काऊंटी सामने खेळणार आहे.'

आयपीएलमध्ये अजिंक्यची तुफान कामगिरी

अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. रहाणेने सीएसकेकडून खेळताना 11 डावात 326 रन्स केले होते. अजिंक्य रहाणेने संपूर्ण आयपीएलमध्ये 2 अर्धशतकं झळकावली. अजिंक्य रहाणेचा 2023 चा स्ट्राईक रेट  त्याचा संपूर्ण आयपीएल इतिहासातील सर्वोच्च होता. 

WTC मधील कामगिरी 

लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये रहाणेचं शतक अवघ्या 11 रन्सने हुकल. भारताच्या पहिल्या डावात 89 रन्स करणाऱ्या रहाणेने नुकतंच 83 टेस्ट सामन्यांमध्ये 5000 रन्स पूर्ण केले.