Ajit pawar : अजित पवारांना पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान द्या, अजित पवार समर्थकांची भावना



 ब्युरो टीम : अजित पवार व त्यांच्या समर्थकांना गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटनेत डावलण्यात येत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यातच, अजित पवार हे विरोधी पक्षनेते म्हणून फारसे आक्रमक होत नाहीत, अशा चर्चा पक्षात अजित पवार विरोधी गटाकडून उघडपणे केल्या जात होत्या. मुख्य म्हणजे अजित पवार विरोधी गटातीलही अनेकजण सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून स्वतः केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर येणार नाही, याची काळजी घेत आहेत, असेही उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादीत अजित पवार समर्थकांची कोंडी करण्यासाठी शीर्षस्थ नेतृत्वाचे कान भरणे अव्याहतपणे सुरू होते, असे अजितदादा समर्थकांचे म्हणणे आहे. 

नकत्याच मुंबईत झालेल्या समारंभात शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत, असे त्यांना सांगितले गेल्यानेच त्यांनी तशी भूमिका घेतली होती असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांनी शरद पवार यांनी निर्णय फिरवल्यानंतर अजित पवार यांना पक्षामध्ये जाणीवपूर्वक खलनायक ठरवले जाऊ लागले. त्यामुळे अजित पवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ होतेच.

दिल्लीतील पक्षाच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करून महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यानंतर तर अजित पवार विरोधकांना अधिकच बळ मिळाले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर राग धुमसत होता. अखेर समर्थकांच्या या रागाला अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात सर्व प्रमुख नेत्यांच्या समोरच वाट मोकळी करून दिल्याने अजित पवार विरोधी गटाची मोठीच पंचाईत झाली आहेपहिल्या औद्योगिक क्रांतीपासून आपण आता चौथ्या औद्योगिक क्रांतीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. पहिल्या तीन क्रांतींमध्ये भारताला फारशी संधी मिळाली नाही. मात्र चौथ्या क्रांतीमध्ये भारत नेतृत्त्वस्थानी आहे, असे मत अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेंटरकडून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित ‘इनोव्हेशन, डिझाइन अँड आंत्रप्रुनरशीप बूटकॅम्प’च्या उद्घाटनावेळी प्रधान बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन, उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, नॅकचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर आगाशे, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी प्रधान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या नवकल्पनांविषयी माहिती घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने