Ajit pawar : लोकसभेला चांगले काम केले तरच विधामसभेचे तिकीट मिळणार - अजित पवार

 


 

ब्युरो टीम : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे, पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वरिष्ट नेत्यांनी लोकसभेत जावं असा काही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. सध्या आमचं लोकसभा निवडणुकीकडं लक्ष आहे. जो लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करेल अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने