Ashadhi ekadashi : पाऊले चालती पंढरीची वाट



ब्युरो टीम : जून महिना सुरु झाला कि आम्हांला पाऊसाचे वेध लागतात. मान्सून सक्रिय होऊन मेघ गर्जनेसह बरसतो. पाऊसामधे आम्हीं आनंदाने ओलेचिंब होत असताना दुसरीकडे वारकरी व विठुरायाचे भक्त विठुनामाच्या भक्तीत ओलेचिंब होताना दिसतात. खरं तर हजारो कि.मी.चा प्रवास पायी करत पोरांपासून थोरांपर्यंत भाविक विठुरायाच्या भक्तीत तल्लीन  होतात. मनात ओढ असते ती विठूरायाच्या दर्शनाची.

पाडुरंग हे नाव घेतले तरी आम्हाला जगण्यास बळ येते. लाखो वारकरी दिंडीत रस्त्याने ज्ञानोबा- तूकोबाचा जयघोष करत न थकता पंढरपूर येथे येतात. विविध दिंडीत सर्व जाती-धर्म-पंथ-भाषेचे लोक सहभागी होतात. हि समतेची, ममतेची, बंधुतेची व भक्तीची दिंडी विठुरायाच्या भक्तीत अखंड बुडते. वारकऱ्यांना चालताना कुठल्याही आजाराची भिती वाटत नाही. जणु काही विठोबाच त्यांना चालवतो कि काय असा भास होता. दिंडीत चालताना वारकऱ्यांना कुटुंबाची काळजी वाटत नाही कारण त्यांना विश्वास असतो की आमच्या पाठीमागे आमचा विठुराया आमच्या कुटुंबाची काळजी घेईल. ऐवढी भक्तांची श्रद्धा विठोबावर असते. कपाळी केशरी गंध, बुक्का, गळ्यात तुळशीमाळ टाळ घातलेला वारकरी आम्हाला विठूरायाप्रमाणे दिसतो. गावागावात या भक्तांचे लोकं स्वागत करतात व चहा, नाष्टा,जेवण देतात. काही ठिकाणी मुक्काम करत मजल-दरमजल करत विठू नामाच्या गजरात हि दिंडी पंढरपूरात पोहचते. या काळात महाराष्ट्रात सर्वत्र वातावरण भक्तीमय दिसुन येते.आयुष्यात सकंटे आली व विठुनामाचा जप केला तरी संकट दूर होतात अशी भावना सर्व भक्तांची आहे. ऐवढी भक्ती विठुरायाच्या चरणी दिसून येते. एखादी वारी काही कारणाने चुकली तर मनास खंत जाणवते. जे वारीला काही कारणाने जावु शकत नाहीत ते घरी राहुनही विठुरायाची भक्ती करतात. कोरोना काळात दोन वर्ष दिंडी जावु शकल्या नाहीत तर काहीतरी हरवल्यासारखे भक्तांना वाटे. दिंडीतील वारकऱ्यांची सेवा गावागावात सर्व जाती धर्मातील लोक एकजुटीने करतात. वारकरी आम्हाला समतेचा व भक्तीचा संदेश देतात.दिंडीत कुठलाही भेदभाव दिसून येत नाही. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगवा झेंडा हा भक्तीचा व समतेचा संदेश देतो. पाडुरंग नाम स्मरणाने,दर्शनाने  परमोच्च आनंद प्राप्त होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी. असे भविक भक्त पंढरपुरास जावुन विठुरायाचे दर्शन घेतात. पंढरपुरात भक्तीचा महापुर दिसून येतो. सर्वांच्या तोंडी एकच नाव असते ते म्हणजे - पाडुरंग-पांडुरंग.

 महेंद्र मिसाळ-लेखक प्रसिध्द व्याख्याते  आहेत 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने