Aurangzeb Photo in Ahmednagar Procession : मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना...फडणवीस म्हणाले



ब्युरो टीम :  अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. रविवारी रात्री अहमदनगर येथील फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकवल्याचा प्रकार समोर आलेला.

अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.

हे सहन केले जाणार नाही, जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी रात्री फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जण औरंगजेबचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याचे पडसाद राज्यातही उमटले असून वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावर फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाचा फोटो झळकविला जाणे कदापी सहन केले जाणार नाही. असे कृत्य कोणी तरीत असेल तर ते मान्य केले जाणार नाही. कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही,’ असेही फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपचे आमदार नीतेश राणे म्हणाले, ‘राज्यात काही भागात अशा प्रकारच्या जिहादी विचारांचे लोक आहे. ते पाकिस्तानच्याही घोषणा देतात. पण त्यांनी लक्षात घ्यावे की आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. ते परत अशी हिमंत करणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेऊ,’ असे राणे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने