Bal shivaji : आकाश ठोसर साकारणार 'बाल शिवाजी ' रवी जाधव च दिग्दर्शन

 

ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. निर्माते संदीप सिंग आणि एव्हीएस स्टुडिओज यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट जाहीर केला आहे. या पोस्टमध्ये ‘सैराट’मध्ये परश्याची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसर हा मुख्य भूमिकेत पहायला मिळतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये निर्मित केला जाणार आहे.

प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहीत आहे. पण त्यांच्या बालपणाविषयी फार क्वचित लोकांना संपूर्ण माहिती आहे. जेव्हा रवी जाधव यांनी मला कथा ऐकवली, तेव्हा मी थक्क झालो होतो. ही कथा आई आणि मुलाविषयी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या जगातील सर्वांत निर्भय आणि शूर योद्धा म्हणून कसं वाढवलं गेलं त्याची ही कथा आहे”, असं निर्माते संदीप सिंग म्हणाले.

बाल शिवाजी या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग यांच्यासोबतच सॅम खान, रवी जाधव, विशाल गुर्नानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने