ब्युरो टीम : सँडविक कोरोमंट इंडिया आस्थापनेने सामाजिक उत्तरदायित्व या संकल्पनेतून शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था औंध येथे संस्थेच्या सहकार्याने विश्व पर्यावरण दिन साजरा केला
५ जून २०२३ रोजी विश्व पर्यावरण दिनानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणेच्या आवारात वृक्षारोपण आणि प्लॅस्टिक मुक्त करून साजरा केला.
समाजामध्ये पर्यावरण समतोला बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सँडविक कोरोमंट इंडिया चे कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औधचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी तसेच स्किलसोनिक कंपनीचे कर्मचारी यांनी ३१ पेक्षा अधिक झाडे लावून व ७० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक जमा करून १४० स्वयंसेवकांनी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला.
या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध, पुणेचे उपसंचालक श्री.रमाकांत भावसार यांनी विद्यार्थी व स्वयंसेवकांना पर्यावरणाची निगा राखण्याची शपत दिली, वृक्ष कुठले लावावेत तसेच वृक्षाचे महत्व सांगितले . श्री किरण आचार्य यांनी प्रशिक्षणार्थी व स्वयंसेवकांना आपल्या मार्गदर्शनामध्ये भविष्यातील वातावरणाच्या धोक्याबद्दल जागरूक केले व पर्यावरणाची निगा राखण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी श्री रमाकांत भावसार , उपसंचालक औद्यागिक प्रशिक्षण संस्था औंध, श्री किरण आचार्य, व्यवस्थापकीय संचालक, सँडविक कोरोमंट इंडिया, श्रीमती रोशनी आचार्य , CSR मॅनेजर, श्री अभिजित चौरे, मार्केटिंग मॅनेजर , श्री.मोहित शिवरकर, सँडविक युनिअन प्रतिनिधी, श्री गणेश सुतार, EHS & ZLD ऑपरेशन हेड, श्री.संदीप महाजन,प्लांट इंजिनीअरीन्ग हेड, श्री .गवारी, श्री.रगतवान आणि श्री योगेश गोरटे, ऑपरेशन हेड स्किलसोनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सँडविक कोरोमंट इंडिया कंपनीचे कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी, तसेच स्किलसोनिक कंपनीचे कर्मचारी विशेष प्रयन्त केले.
टिप्पणी पोस्ट करा