शरद पवारांच्या पत्रकार परिषद नंतर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रंगले ट्वीटर वॉर

 

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखती नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली यानंतर भाजपाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊन्ट वरून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. भाजपने यासंदर्भात दोन ट्वीट केले, त्या भाजपाच्या दोन ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रतिउत्तर दिले असुन, यातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ट्वीटर वॉर रंगल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे 

    भाजपने आपल्या पहिल्या ट्वीट मध्ये लिहले की "पदाची लालसा आणि सत्त्तेची लालसेबद्दल शरद पवारांनी आम्हाला सांगूच नये. शरद पवारांनी सत्तेसाठी आणि पदासाठी काय काय केले हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. काल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस म्हणालेच होते की, शरद पवारांची मिस्ट्री समजण्यासाठी त्यांची हिस्ट्री  समजायला हवी. १९७७ साली स्थापन केलेली सत्ता ही जशी तुमची मुसद्देगीरी होती तशी आम्हीही केली.. पण तुमची ती मुसद्देगीरी आणि आमची ती बेईमानी कशी? विदेशी मॅडम सोबत राजकारण नको म्हणून तुम्ही वेगळा पक्ष काढलात. मात्र आपली डाळ शिजत नाही हे  लक्षात आल्यावर पुन्हा एकदा विदेशी मॅडमशी संधाण साधत सत्ता उपभोगली. आता मात्र स्वतःचा भूतकाळ विसरलात"

    राष्ट्रवादी काँग्रेसने यास उत्तर देताना लिहिले आहे "सत्तेसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता ही भाजपाची भूमिका समाजासमोर वारंवार आलेली आहे. भाजपा सत्तेसाठी किती लाचार आहे याची प्रचिती महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, गुवाहटी आणि गोवातील जनतेलाही मिळाली आहे आणि या राज्यांची सफर करून आलेले शिवसेनेचे आमदार याचे चालते बोलते पुरावे आहेत. तेव्हा आपल्या सत्तालोलुपतेची वाच्यता होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा जुना इतिहास उकरून काढायचा आणि लोकांच्या मनावर चुकीचा इतिहास ठसवत राहायचा ही भाजपाची जुनी मोडस ऑपरेंडी आहे. काँग्रेसवर टीका करणे हे एकच धोरण तुम्ही गेली ९ वर्षे देशात राबवत आहात. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्यातलही हेच धोरण तुम्ही सुरू केले आहे, हे उघड आहे.. कधीतरी यातून बाहेर पडून विकासाच्या मुद्द्यांवर बोला.."


    
यानंतर भाजपने दुसरे एक  ट्वीट केले असुन त्यात  लिहले की " ज्येष्ठ नेते शरद पवारजी  विकेट तर तुमची गेली आहे. स्वतःला जाणता राजा, मुसद्देगीरीचे बादशहा म्हणताना तुमच्याच लोकांनी तुमची  विकेट काढली.  २०१९ ला जनतेने तुम्हाला नाकारलं, तेव्हा तुम्हीच उध्दव ठाकरेंना सत्तेच गाजर दाखवतं गद्दारी करायला शिकवलं. आणि सत्ता हातात आल्यावर राज्यामध्ये तुम्ही आनागोंदी माजवली.  मात्र ज्यांना शाळकरी मुलागा म्हणून तुम्ही हिणवलं, ज्याच्या हातून तुम्ही सत्ता गद्दारी करुन हिणवून घेतली, त्याच शाळकरी मुलानं तुमच्या नाका खालून न्यायानं आणि संविधानिक सत्ता स्थापन करुन महाराष्ट्राचा गतीमान विकास केला. कारण आम्हाला शाब्दीक राजकारणापेक्षा महाराष्ट्राचा विकासच महत्त्वाचा वाटतो.

    राष्ट्रवादी काँग्रेसने यास उत्तर देताना लिहिले आहे "अहो, विकेट गेलेला माणूस, विकेट गेली म्हणून सांगतो का? आपल्याच सोशल मीडियावरून आपलीच विकेट पवार साहेबांनी कशी काढली याचा किती गाजावाजा करणार?"



    यानंतर परत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरला कोट करून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे "@NCPspeaks ज्येष्ठ नेते  @PawarSpeaks , कधी नव्हे ते खरं बोललात. ज्याची विकेट जाते तो कधीच म्हणत नाही माझी विकेट गेली म्हणून, आता  बघा ना तुमचीच विकेट कशी गेली होती ते...



या ट्वीटर वॉरची आता सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने