Bollywood : चित्रपटात काम मिळण्यासाठी करावी लागली.. अनेक वर्ष वाट, अभिनेत्री प्रिया बापट च वक्तव्य



 ब्युरो टीम : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजमुळं चर्चेत आली आहे. या हिंदी सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मुख्य भूमिका मिळवण्यासाठी तिला कित्येक वर्ष वाट पाहावी लागली, असं तिनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

म्हातारीच्या भूमिकेतून रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या प्रियानं 'गुड मॉर्निंग' करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. हिंदी 'मुन्नाभाई'मध्ये ती चमकली. पुढं काही मालिका, 'मी शिवाजीराजे...', 'आनंदी आनंद', 'टाइम प्लीज', 'काकस्पर्श'सारखे सिनेमे तिने केले. पण मुन्नाभाई MBBS आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातल्या तिच्या भूमिका छोट्या असल्या तरी लक्षवेधी ठरल्या होत्या.

मुन्नाभाई चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते की, तो चित्रपट तिला अगदी सहज मिळाला. राजकुमार हिरानी यांच्या ऑफिसमधूनल तिला फोन आला.ऑडिशन दिलं आणि तिला तो रोल मिळाला...इतकं सोपं होतं ते.

चित्रपटासाठी शूटिंग केल्यानंतरही तिला समजलं नव्हतं की, हा चित्रपट किती मोठा आहे. ती म्हणाली की, मी इतकी भोळी होते की, मला कळालंच नव्हतं की, मी शूटिंग करतेय तो इतका मोठा चित्रपट आहे. संजय दत्त आहे..राजकुमार हिरानी आहेत...विशेष काय वाटायचं नाही. पण जेव्हा मी या चित्रपटाच्या प्रिमियरला गेले तेव्हा समजलं की, हा किती मोठा सिनेमा आहे. तेव्हा मी स्वत:वरच खूष झाले होते.

दरम्यान, सिटी ऑफ ड्रिम्सच्या पहिल्या सीझनमध्ये प्रियाचा बोल्ड सीन व्हायरल झाला होता. हा लेस्बियन सीन व्हायरल झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली होती, हे सांगताना ती म्हणाली की, तेव्हा तो एकच सीन व्हायरल झाला आणि नंतरचे एक दोन दिवस खूप त्रास झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने