Devid worner : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केली मोठी घोषणा


 ब्युरो टीम : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्धच्या WTC फायनलपूर्वी कसोटी क्रिकेटबाबत मोठी घोषणा केली आहे. वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीला कधी आणि कुठे विराम देणार आहे हे सांगितले आहे. त्याने शनिवारी हा खुलासा केला. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये डावखुरा फलंदाज वॉर्नर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत वॉर्नरकडून वेगवान सुरुवात करण्याची कांगारू संघाची अपेक्षा आहे. वॉर्नरने अलीकडेच आयपीएलच्या 16व्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. दिल्लीसाठी वन मॅन आर्मीप्रमाणे लढला.

डेव्हिड वॉर्नरला त्याच्या घरच्या मैदानावर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर जानेवारीत पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात कारकिर्दीचा शेवट करायचा आहे. पुढील आठवड्यात भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी तयारी करताना सराव सत्रापूर्वी बोलताना वॉर्नरने आशा व्यक्त केली की, पाकिस्तानविरुद्धची सिडनी कसोटी हा त्याचा शेवटचा कसोटी सामना असेल.

कसोटीत धावांसाठी वॉर्नरचा संघर्ष

या धडाकेबाज सलामीवीराला अलीकडच्या काळात दीर्घ फॉर्मेटमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित नाही. वॉर्नर म्हणाला, 'संघात टिकण्यासाठी तुम्हाला धावा कराव्या लागतात. मी सुरुवातीपासूनच सांगतोय की (2024) टी-20 विश्वचषक हा कदाचित माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. जर मी येथे धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियातही खेळत राहिलो, तर मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही, असेही त्याने स्पष्ट केलं. पुढे तो म्हणाला की "जर मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि ऍशेसमध्ये धावा केल्या आणि पाकिस्तान सीरिजसाठी टीममध्ये निवडले तर मला नक्कीच माझी कारकीर्द तिथेच संपवायला आवडेल."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने