,ब्युरो टीम : ‘‘ अमेरिकेकडून सडलेला गहू घेणारा, भारत आता जगाला औषधे पुरवू लागला आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात भारत नेतृत्व मिळवत असून, आपल्या शैक्षणिक पद्धतींना जगमान्यता मिळत आहे. भारतात प्रचंड गुणवत्ता आहे. त्यासाठी इंग्रजीची गरज नाही. अनेक विकसित देश हे इंग्रजीला महत्त्व देत नाहीत. संकल्पना मातृभाषेतून चांगल्या रितीने समजणार आहे. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने सृजन चांगले होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जगात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले
’’ भारताच्या नव्या शिक्षणाचे मॉडेल जगातील विविध देशांकडून स्वीकारण्यात येत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयटींचे कॅम्पस आता परदेशात सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. आगाशे यांनी प्रास्ताविक केले.आगामी काळात ग्रामीण भागातील मुले शहरी मुलांच्या पुढे जाणार आहेत. भारताच्या शिक्षण आणि संशोधनाच्या पद्धती जागतिक स्तरावर स्वीकारले जात आहे. या पद्धती जागतिक स्तरावर स्वीकारले जाऊन उपयोग नाही, तर त्यासाठी गुणवत्तापूर्ण किफायतशीर उत्पादने विकसित व्हायला हवीत. - धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री
टिप्पणी पोस्ट करा