ब्युरो टीम :महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता 11 महिन्यांचा कालावधी उलटला आहे, पण अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. शिवसेना-भाजपचे प्रत्येकी 9-9 आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे मिळून 20 मंत्री राज्य सरकार चालवत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला रोज नवनवीन मुहूर्त मिळत आहेत, पण यावरून आमदारांमध्येही नाराजी दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदाराने मंत्रिमंडळ विस्तारावरून थेट इशारा दिला आहे.
मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या, मात्र बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला 100 टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला दिला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आता घ्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र भोंडेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने पालकमंत्री पद देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्यालाही मिळायला हवं, असं मत नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केल मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्याच आठवड्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आले. यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा