ब्युरो टीम : अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट जेव्हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो तुफान हिट ठरला होता. त्यावेळी या चित्रपटाची तब्बल पाच कोटी तिकिटं विकली गेली होती. सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी पहिला भाग पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाला आतासुद्धा बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. अवघ्या तीन दिवसांत ‘गदर’ने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
टिप्पणी पोस्ट करा