ब्युरो टीम : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात दाखल केलेल्या पाच कोटींच्या अब्रू नुकसानीच्या खटल्याप्रकरणी मंगळवारी न्यायालयात पुन्हा कामकाज झाले.
त्यावेळी गुलाबराव पाटलांनी वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने पाटील यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला.
२०१६ मध्ये खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. खडसेंनी न्यायालयात शपथपत्र सादर केल्यानंतर मंगळवारी पुन्हा कामकाज झाले. यावेळी न्यायालयात खडसे व पाटील हे दोन्ही नेते हजर झाले नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा