ब्युरो टीम :राज्यात सध्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत, याचा खुलासा नुकतचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठी माहिती दिली आहे
काय म्हणाले शंभुराज देसाई?शंभुराज देसाई पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी माहिती दिली. विषय संपवू आणि २०२४ च्या कामाला लागू. सामंज्यासाच्या भूमिकेतून पुढे जाऊ. पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची समन्वय समिती करु. अस यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितलं. ...
युतीमध्ये वाद?आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन शिंदे गट आणि भाजप आमदार खासदार यांच्यात वाद सुरु आहे. अशातच 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो झळकले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आलं होतं. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी बोलताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. 'बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही', अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे
टिप्पणी पोस्ट करा