Ms dhoni : लग्नपत्रिकेत छापला एम. एस धोनीचा फोटो आणि जर्सी नंबर,


ब्युरो टीम : भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी लाखो लोकांच्या हृदयाची धडकन आहे. त्याच्या चाहतावर्ग काही कमी नाही. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारे, त्याच्या एका झलकसाठी तासनतास वाट पाहणारे असे त्याचे क्रेझी फॅन आहेत. त्यामुळे त्याच्या फॅनविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर तर त्याच्या चाहत्यांविषयीदेखील बातम्या झपाट्याने व्हायरल होतात. नुकताच धोनीचा आणखी एक जबरा फॅन पहायला मिळाला. त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

सोशल मीडियावर सध्या महेंद्रसिंग धोनी म्हणजेच माहीच्या जबऱ्या फॅनची चर्चा रंगली आहे. धोनीच्या एका चाहत्याने त्याच्या लग्नाच्या कार्डवर स्वतःचा फोटो लावण्याऐवजी धोनीचा फोटो लावला होता. त्याची ही हटके लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने