ब्युरो टीम : मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी केली होती. कारण मुंबईच्या संघाला जेतेपद पटकावता आले नसले तरी त्यांनी या स्पर्धेत तिसरा क्रमाक पटकावला होता. गेल्या हंगामात तर मुंबईचा संघ हा सर्वप्रथम स्पर्धेच्या बाहेर पडला होता, त्यानंतर आता या वर्षी त्यांची कामगिरी तुलनेत चांगली झाल्याचे समोर आले आहे. पण दुसरीकडे मात्र रोहित शर्मावर जोरदार टीका सुरु झाली आहे. कारण रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. रोहित सध्या फलंदाज म्हणून वाईट फॉर्मात आहे. रोहितला आयपीएलमध्येही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडून आता मुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून घेतले का, असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो.
रोहित फॉर्मात नसला तरी आयपीएलमधी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडेच कायम आहे. पण मुंबई इंडियन्सचा संघ न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे आणि त्याचते कर्णधारपद आता पोलार्डला देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्कच्या लीगसाठी आपल्या आठ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये आता नेतृत्व पोलार्डकडे असेल तर रशिद खान नावाचा टी-२० मधील हुकमी एक्का आता या संघात असणार आहे. या दोघांसहीत टीम डेव्हिड आणि जेसन बर्डनहॉफ हे दोघे मुंबई इंडियन्समध्ये यापूर्वीही खेळत होते आणि ते या स्पर्धेतही खेळणार आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पुरनही यावेळी मुंबईच्या संघात आहे, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्स या संघाने आता बऱ्याच लीगमध्ये आपले संघ उतरवण्याचे ठरवले आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी आपाल वेगळा संघ उतरवला होता.
टिप्पणी पोस्ट करा