Narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२७ जून) समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले. तसेच समान नागरी कायद्यावरून अल्पसंख्याक समाजाला विरोधकांनी भडकवल्याबद्दल त्यांनी विरोधकांवरही प्रहार केला. २२ व्या विधी आयोगाने ३० दिवसांच्या आत समान नागरी कायद्यावर जनता आणि मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांना सूचना करण्याचे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी या कायद्यावर भाष्य केले आहे.

समान नागरी कायदा म्हणजे काय?

भारतातील सर्व धर्मांच्या लोकांसाठी एकाच प्रकारचे वैयक्तिक कायदे असणे म्हणजे समान नागरी कायदा होय. वारसा, लग्न, घटस्फोट, मुलांचा ताबा व पोटगी या बाबींचा यात समावेश होतो. सध्या भारतात वैयक्तिक कायद्याचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक धर्माचे या संदर्भात स्वत:चे कायदे आहेत. हिंदू, शीख, जैन, बौद्ध धर्मीयांसाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो; तर ख्रिश्चन, मुस्लिम धर्मीयांसाठी वेगळे कायदे आहेत. समान नागरी संहितेचे स्वरूप अनेकदा वादग्रस्त राहिले आहे. घटनेतही या संकल्पनेचा उल्लेख आढळतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने