Ncp : पंढरपूरातील राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?

 


ब्युरो टीम : आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यात राजकीय पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात हळुहळु के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सध्या विस्तारताना दिसत आहे. राज्यातील नेते, त्यांचे कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच पंढरपूरमधील राष्ट्रवादीचे समर्थक भालके कुटुंब. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके हे बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत

भगिरथ भालके राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भगिरथ भालके बीआरएस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असण्याचं कारण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाचा आणि भालके यांचा संपर्क वाढल्याने ही शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत आहे

दरम्यान भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा एक लाख पाच हजार मतं त्यांना मिळाली. भालके यांना मानणारी मोठी संख्या पंढरपुरची आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडली तर राष्ट्रवादीसाठी पंढरपुरात हा मोठा धक्का असणार आहे

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाने राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली. मागच्या काही दिवसात अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपुर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता बीआरएसमध्ये होणारे प्रवेश राज्यातील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्ष हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने