ब्युरो टीम : विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन व आयोजकांनी चुकीचा प्रोमो व्हिडिओ मागे घेतला ; नावांची दुरूस्ती केली तसेच सावित्रीबाई फुले यांचा फोटो समाविष्ट केला आणि झालेल्या चुकीबद्दल msg च्या स्वरूपात दिलगीरीव्यक्त केली
पुण्यात सुरु असलेल्या G-20 शैक्षणिक कार्यकारी गटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या एक्झिबिशनची माहिती देण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमावरील पोस्टसाठी आम्ही व्हिडीओ तयार केला होता. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नांव अनावधानाने आमच्याकडून अपूर्ण घेतले गेले होते, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
सुधारीत व्हिडीओ आम्ही पुन:प्रसारीत करीत आहोत.
... G20 आयोजन समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
या सर्व संघर्षात वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संस्था आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला होता . समाजातील वेगवेगळ्या अभ्यासक , विचारवंत व राजकीय व्यक्तींनी यासंबंधी भाष्य केले . व आम्ही करत असलेल्या सातत्यापुर्ण संघर्षाला बळ दिले . त्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद .. मा. प्रा. हरी नरके सर यांचे विशेष सहकार्य लाभले .
टिप्पणी पोस्ट करा