ब्युरो टीम : ३ जून रोजी भारतीय महिला कुस्तीपटूंच्या समर्थनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कॕन्डल मार्च व निषेध मोर्चा काढला . तसेच नांदेड येथे अक्षय भालेराव या तरूण कार्यकर्त्यांची मनुवादी व जातीयवादी लोकांच्याकडून जी हत्या करण्यात आली त्याचा देखील निषेध व विरोध यावेळी करण्यात आला . डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत कॕन्डल मार्च व निषेध मोर्चा काढण्यात आला . यामध्ये विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागात विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या सामाजिक , राजकीय संघटनांने प्रतिनिधी सहभागी झाले होते . सर्व विद्यार्थी व संघटनांनी दोन प्रमुख मागण्या यावेळी गेल्या आहेत . १) महिला खेळाडूचे शोषण करणाऱ्या आरोपी ब्रिजभूषण सिंह याच्यावर कडक कारवाई करावी . २) अक्षय भालेराव या तरूणांची हत्या करणाऱ्या दोषीवर कठोर करवाई करून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत . यासाठी आपण प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे .
उपस्थित सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी
१) अॕड. क्रांती सहाणे [ महासचिव - आझाद समाज पार्टी महाराष्ट्र ]
२) सोमनाथ लोहार [ राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस - महाराष्ट्र प्रदेश सचिव ]
३) जयकर गायकवाड - [ इंडियन रीसर्च स्काॕलर अशोसियशन, सल्लागार, महाराष्ट्र राज्य. ]
४) सुदर्शन चकाले [ सहसचिव, युवक क्रांती दल, पुणे शहर ]
५) सचिन पांडुळे [ अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर ]
६) आदिनाथ जाविर - [ राष्ट्रीय कॉग्रेस ]
७ ) आकाश दौंडे [ उप सरपंच - सोमठाणे ]
८) परमेश्वर अंडील- [ महासचिव, विद्यार्थी काँग्रेस, पुणे जिल्हा,] ९) झैद शेख , निशांत देशमुख - सामाजिक कार्यकर्ता
१० ) निहारीका भोसले - नव समाजवादी पर्याय
११) दिपक जाधव ( पत्रकार जागल्या भारत )
१२) अनिकेत साळवे - सामाजिक कार्यकर्ता
१३ ) संपदा डेंगळे - [ छात्रभारती ]
1४ ) आरती बेरड , श्रध्दा ढवळे - आकार फाऊंडेशन
१५ ) संपदा डेंगळे - [ छात्रभारती ]
कृती समिती सदस्य - , ओम बोदले , तुकाराम शिंदे , रक्षा पुरोहित , रामदास वाघमारे , समाधान दुपारगुडे तसेच विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा