ब्युरो टीम : सपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० व्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा केला जात आहे. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला शिवराज्यभिषेक दिनाचा विसर पडलेला दिसून येत आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने महाराजांना साधा एक हार घातला नाही. किंवा साधे अभिवादन देखील केले नाही. सबंधित बाब विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी व युवासेनेचे पुणे शहराच्या पदाधिकारी यांनी मा. कुलगुरू यांच्याकडे विचारणा केली व निषेध व्यक्त केला . त्यानंतर विद्यार्थी युवासेना प्रतिनिधींनी विद्यापीठ प्रशासनाची वाट न पाहता सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांमध्ये युवासेना पुणे शहर अध्यक्ष राम थरकुडे, नारायण चापके, मयूर भालेकर, आनंद भिलारे, गणेश काकडे व विद्यार्थ्यांच्या वतीने राहूल ससाणे, कुलदीप आंबेकर आणि तुकाराम शिंदे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा