ब्युरो टीम : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायला सुरूवात केली आहे. मागच्या काही काळापासून बीआरएसमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होताना दिसत आहेत. बीआरएसने आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आता थेट राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे.
बीआरसमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नारकाली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. यासोबतच आमच्या सोबत असणाऱ्या काहींना बीआरएस फोडत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
बीआरएसने राजू शेट्टी यांच्याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने पक्षात येण्याची ऑफर दिली होती तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची ऑफर दिली होती. तर या ऑफरवरती पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद न दिल्याने आता बीआरएसने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून के. चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. बीआरएसच्या विस्तारासाठी केसीआर यांनी महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं. त्याच्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते भगीरत भालके यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला आहे
टिप्पणी पोस्ट करा