ब्युरो टीम : आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच्या प्रदर्शनापासून 80 च्या दशकामध्ये टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण' (Ramanand Sagar Ramayan) या मालिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा असल्याचं पहायला मिळत आहे. अनेकांनी 'आदिपुरुष' चित्रपटामधील पात्र, कथेशी करण्यात आलेली मोडतोड यासारख्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हे जुनं 'रामायण' (Ramayan) अधिक छान होतं असं अनेकांनी यामधील छोटे व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट पोस्ट करत शेअर म्हटलं. एकीकडे अनेकांना या मालिकेची आठवण होत असतानाच दुसरीकडे 'शेमारु टीव्ही'ने त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन या जुन्या 'रामायण' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
कधी दाखवली जाणार ही मालिका?
"सर्व प्रिय प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत जगप्रसिद्ध पौराणिक मालिका 'रामायण'" अशी कॅप्शनसहीत हा प्रोमो 'शेमारु टीव्ही'ने शेअर केला आहे. 'रामायण' मालिका 3 जुलैपासून रोज सायंकाळी साडेसात वाजता दाखवली जाणार आहे. ही मालिका 'शेमारु टीव्ही'वर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी प्रभू श्री रामाची, दिपिका चिखालिया यांनी सीता मातेची तर सुनील लाहिर यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. दिवंगत अभिनेते दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका साकारली असून अरविंद तिवारी यांनी रावणाची भूमिकेत झळकले होते.
अनेकांनी केल्या कमेंट्स
आजही 'रामायणा'वर आधारित सर्वोत्तम मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या या मालिकेचा उल्लेख केला जातो. ही मालिका सर्वात आधी 25 जानेवारी 1987 पासून 31 जुलै 1988 दरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती. या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी या प्रोमोवर हार्ट आणि 'जय श्री राम' अशा कमेंट्स केल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा