Sayas :श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर सायास संस्थेच्या स्वयंसेवकांची स्वच्छता मोहीम.



ब्युरो टीम : पुणे विश्रांतवाडी चौक ते आळंदी रोड पोलीस चौकी या भागामध्ये सायस फाउंडेशन या संस्थेच्या स्वयंसेवकांच्याद्वारे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

पालखी मार्गावर अनेक भाविक आपापल्या परीने काही ना काही खाद्यपदार्थ व चहापाण्याची वाटप करत असतात.

वारी चालत असताना बरेचदा अनावधानाने पाण्याच्या बाटल्या, चहाची कप, केळीची साल, पात्रावळी व प्लेट ह्या रस्त्यावर टाकल्या जातात.

पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी स्वच्छ असावा अशी संकल्पना सायास फाउंडेशनच्या सदस्यांच्या लक्षात आली. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षापासून सायास फाउंडेशनचे स्वयंसेवक आळंदी रोडवरील पोलीस चौकी ते विश्रांतवाडी चौक येथे स्वच्छता मोहीम राबवतात. ही स्वच्छता होईल यावर्षी सुद्धा जवळपास 20 ते 25 स्वयंसेवकाच्या सहकार्याने पार पडली. असाध्य ते साध्य करिता सायास या तुकाराम महाराजांच्या ओवीला सार्थक ठरवणारं हे कार्य श्री सचिन देशमुख अध्यक्ष सायास फाउंडेशन यांच्या नेतृत्वात पार पडले.

या अभियानामध्ये योगेश गोरटे ऑपरेशन हेड स्किलसोनिक , योगेश बाविस्कर व्हाईस प्रेसिडेंट स्किलसोनीक, श्री विनोद अरगुलवार, श्री प्रदीप सावळे श्री किशोर मराठे मॅनेजर स्किलसोनिक, श्री कुणाल पटेल मॅनेजर स्किलसोनीक यांचे सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने