Shashikant shinde: शरद पवारांचा कार्यकर्ता, भावाच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदेंचा इशारा



ब्युरो टीम : माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी रविवारी ( ४ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. या प्रवेशामुळे साताऱ्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“मंत्रिमंडळ विस्तारावरून बरेच लोक नाराज आहे. हे फक्त ५० खोक्यांपुरते मर्यादित नाही. जर कोणाला मंत्रिपद मिळालं नाहीतर युतीला फटका बसू शकतो,” असं सांगत शशिकांत शिंदे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील पक्षाची ताकद कमी होईल, हा भाजपाचा अजेंडा असू शकतो. एखाद्या पक्षात नाराजगी नसेल, तर यापद्धतीने काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी युती फोडायची नाहीतर, संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

सत्ता आल्यानंतर अनेक नेत्यांच्या घरातील नातेवाईक फोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या मोठ्या बंधूंना त्यांनी पक्षात घेतलं असेल. लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे माझ्या बंधूंनी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, तो मनापासून होता की अडचणीमुळे केला, त्यावर ते बोलतील,” असं शशिकांत शिंदेंनी सांगितलं.

माझे भाऊ गेले म्हणून मला फरक पडत नाही. मी शरद पवारांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. दबाव टाकून पक्षात बदल करण्याचा हेतू असेल. पण, दुपटीने काम करून शिंदे-फडणवीस युतीला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करू,” असा निर्धार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने