Sunny deol : तिने जे केलं ते मी केलं नसतं; धर्मेंद्र-हेमाच्या लग्नावर प्रकाश कौर यांची प्रतिक्रिया



 ब्युरो टीम : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) याच्या मुलाचं करणचं नुकतंच थाटात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याची संपूर्ण कलाविश्वात चर्चा सुरु आहे. यामध्येच करणची आजी म्हणजेच धर्मेंद्र (dharmendra) यांच्या दोन्ही पत्नी प्रकाशकौर prakash kaur) आणि हेमा मालिनी या चर्चेत येत आहेत. करणच्या लग्नाला हेमा मालिनी (hema malini) उपस्थित न राहिल्यामुळे या दोन्हीं सवतींमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. यामध्येच प्रकाशकौर यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी हेमा मालिनी-धर्मेंद्र यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

र्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. परंतु, त्यांनी प्रकाशकौरला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे या दोन सवतींचं नातं प्रचंड गुंतागुंतीचं झालं आहे. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांनी 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. परंतु, त्याचवेळी त्यांनी धर्मेंद्रची बाजूही घेतली होती.

"फक्त माझाच नवरा कशाला? माझ्याऐवजी हेमाची निवड कोणीही करेल. अर्ध्या इंडस्ट्रीमध्ये हेच घडत असताना केवळ माझ्याच नवऱ्याला कोणी बाईलवेडा का म्हणेल? जवळपास सगळ्याच अभिनेत्यांचं अफेअर असून ते दुसऱ्यांदा लग्न करत आहेत", असं प्रकाश कौर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "ते एक चांगला नवरा होऊ शकले नाहीत. पण, एक चांगले व्यक्ती आहेत. चांगले पिता आहेत. त्यांचं त्यांच्या मुलांवर खूप प्रेम आहे. ते त्यांच्या मुलांना कधीच अंतर देत नाहीत. मला कळतंय हेमा कोणत्या परिस्थितीतून जातीये. तिला सुद्धा, नातेवाईक, मित्रपरिवार आणि जगाला तोंड दाखवायचं आहे. पण हा एक आहे जर मी हेमाच्या जागी असते तर तिने जे केलं ते कधीच केलं नसतं. मी तिच्या भावना समजू शकते. पण, एक पत्नी आणि आई असल्यामुळे घडलेल्या या प्रकाराचा कधीच स्वीकार करु शकत नाही."

दरम्यान, तुम हसीन मैं जवान या सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र- हेमा मालिनी यांची भेट झाली. आणि याच सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने