Supriya sule : यांचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करणार'; सुप्रिया सुळेंचा इशारा, म्हणाल्या

 



ब्युरो टीम : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. "बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. इकडे येऊन मिजास दाखवायची नाही", असं म्हणत सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या आहेत.


मागच्या आठवड्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जल जीवन मिशनचे उद्धाटन केलं. त्यावेळी स्थानिक लोक प्रतिनिधींना आमंत्रण दिले नव्हते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतून येऊन इथे चिखलफेक केली तर आपण दिल्लीत जाऊन उत्तर द्यायचे इथे आल्यावर अतिथी देवो भवः असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. याला सुप्रिया सुळे प्रत्युत्तर देत “होय मला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे,” असं म्हटलं.

कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर घराणेशाहीची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडं असतात.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने