ब्युरो टीम :महाराष्ट्रातील एकवीस नेते आहेत की त्यांना इडीने नोटीस दिली. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली. त्यामुळे आता राजकीय व्यवस्था निर्भय बनली पाहिजे. नाही तर परिस्थिती अवघड असून राजकीय व्यवस्था भयभीत आहेत. परिस्थिती बदलण्याचे निर्भय बनण्याचे गरज आहे असे मत निर्भय बनो अभियानचे प्रमुख विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. पत्रकारानी लिहिताना निर्भय बनण्याची गरज आहे असेही चौधरी म्हणाले.
बीड येथे मराठी पत्रकार परिषदेतर्फे मराठवाडा स्तरीय पत्रकारांचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा आज (रविवार दि. 4) माॅ वैष्णवी देवी पॅलेस सभागृहात झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व निर्भय बनो अभियानचे प्रमुख विश्वंभर चौधरी, प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. असीम सरोदे, राज्यअध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी,भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, भारत राष्ट्र समितीचे नेते अॅड. माधव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे लोकप्रश्न ते संपादक जेष्ठ पत्रकार दिलीपराव खिस्ती यांना पत्रभुषण, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले यांना समाजभूषण, प्रगतीशील आदर्श शेतकरी कल्याण कुलकर्णी यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवले. मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्ह्यातर्फे माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारीता सेवा गौरव पुरस्काराने अहमदनगर येथील सकाळ-ॲग्रोवन चे मुख्य बातमीदार सूर्यकांत नेटके, स्व. प्रभाकर कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारीता पुरस्कारानै बीडमधील पत्रकार अनिल जाधव यांना यावेळी गौरवले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या डिजीटल मिडीयाचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे, राज्यसंपर्क प्रमुख अनिल महाजन, राज्यसंपर्क सह प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, मराठवाडा विभागप्रमुख सुभाष चौरै, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाट, कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, सतीश बियाणी, संजय हंगे, बालकिसन सोनी, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, रवि उबाळे, नागनाथ सोनटक्के, चंद्रकांत राजहंस, धनंजर,आरबोने, आविनाश कदम, साहस आदोडे, मधुकर तौरे, सचीन पवार, विनायक जाधव, हरिष यादव , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना असीम सरोदे म्हणाले, पत्रकाराकडून काम करणाऱ्या लोकांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत याचं दुःख आहे. मानवी मूल्य असलेल्या, अन्याय अत्याचाराचा आवाज उठवणाऱ्या बातम्या सगळीकडे जाऊ शकतात. माणसाचे प्रश्न मांडण्याची गरज आहे. नाव बदल्याने विकास होत नाही. खरे विकासाचे प्रश्न मांडावेत. ग्रामीण पत्रकारानी अधिक जोमात लिहावे. लव्ह जिहाद होत नाही. ज्यांचा राजकारण देशाचा आहे ते लोक प्रेमाला विरोध करू शकतात. अनैतिकच गोष्टीची शहानिशा होत नाही. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्नावर लिहणारयाला संरक्षण गरजेचे आहे. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा सत्य लिहिणाऱ्याला जर सुरक्षेची गरज पडली तर त्याचे मी स्वतः केस चालवील. सुरक्षा आणि संरक्षणाची पत्रकारांना वारंवार गरज पडली पाहिजे अशी पत्रकारिता करण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र काय आहे हे आजही अनेकांना कळले नाही. ते समजून घेतलं पाहिजे.कायद्याचा वापर असून उपयोग असून उपयोग नाही. तो समजून घेतला पाहीजे. कायदा समजून घेतला पाहीजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी स्वतंत्र स्वायत्ता यंत्रणा आणि कायदा असण्याची गरज आहे. न्यायालयातील काही न्यायाधीश राजकीय आणि धर्माध विचाराचा बाजूने असल्याचे सातत्याने दिसत आहे. पेडन्युज हे अवघड बाब झाली आहे. निवडणुकांत सर्वाधिक माध्यमाचा वापर होत आहे. भारताची परिस्थिती आता माध्यमातून येण्याची गरज आहे. जिवंत माणसाला मारून टाकण्याची क्षमता माध्यमात आहे. त्यापेक्षा जिवंत माणसोबत उभे रहा.
उपजीविकेवर होणाऱ्या हल्ल्याचे काय करायचे हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे हल्ले केवळ एका भागात नव्हे तर देशभरात पत्रकारितेच्या व्यवसायावर हल्ले होत आहेत. देशात जे चाललंय ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे निर्भय बनण्याची गरज निर्माण झाली आहे. पेड न्यूज पत्रकारांची नावे मालकांची आहे. आता तर पेड न्यूजच्याही पुढे गेले आहे. पत्रकारांचा दोष नाहीतर मालक छापू देत नाहीत. मालकच विकल्याने परिस्थिती अवघड झालेली आहे. दिल्लीतील कुस्तीगीर महिलांच्या आंदोलनाकडे मुख्य माध्यमे दुर्लक्ष करत आहेत. आता छोटे पत्रकार खरा आवाज उठवत आहेत. देशात जे चाललेय त्याला दोन व्यक्ती जबाबदार आहेत. निर्भय बनो ची 2024 ची मुख्य भूमिका असेल की मोदी आणि शहा नको. एकही विधेयक त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना ते दाखवले जात नाही. देशाच्या अर्थकारण काय चालले आहे हे मीडियाने पाहणे गरजेचे आहे. होते व निर्यात बंदी करतात शेतातील पीक आले की तर पाडले जातात. शेतकरी सन्मान निधीतून खात्यात देणारे पैसे आणि शेतमालातील पाडले जाणारे दर याचा ताळमेळ घालून दाखवावा असे माझे आव्हान आहे. हे हिटलरशाही लवकर ओळखली पाहिजे. महाराष्ट्रातील एकवीस नेते आहेत की त्यांना इडीने नोटीस दिली. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली. त्यामुळे आता राजकीय व्यवस्था निर्भय बनली पाहिजे. नाही तर परिस्थिती अवघड असून राजकीय व्यवस्था भयभीत आहेत. आम्ही या 21 लोकांचे फोटो घेऊन ईडी कार्यालयासमोर घोषणाबाजी करणार आहोत. पैसा भारतात येणार होता त्याचे काय झाले याचे उत्तर कोणी देत नाही. राहुल गांधीला नव्हे तर भारतातील लोकांना आव्हान दिले जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये समाजाला जगणाऱ्या अनेक योजना आल्या. मोदींनी एकही कायदा लोककल्याणासाठी आणलेला नाही. आणीबाणीच्या काळात जी लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये खदखद होती ती खदखद आत्ता दिसत आहे. समाजाच्या कल्याणासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी निर्भय बनो मध्ये यावे असे आवाहन यावेळी विश्वंभर चौधरी यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख भाषणात म्हणाले, ''केवळ समाजातच नव्हे तर पत्रकारातही बुद्धीभेद करण्याचे आणि वेगवेगळे गट पाडून विभागणी करण्याचे काम केले जात आहे. लोक करत आहेत पत्रकारांच्या प्रश्नावर संघटना झाल्या पाहिजेत परंतु मालक पुरस्कृत संघटना होत असल्याने चिंताजनक बाब आहे. संकटकाळी पत्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आडस सामोरे जातात त्यावेळी जर दुर्लक्ष केले जात असेल तर पत्रकारांनी कोणासाठी लढायचं? हाही प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. पत्रकाराच्या चळवळीला बळ देत पत्रकारांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे झाले तर पत्रकार अधिक पण निर्भयपणे काम करतील. पत्रकार आणि प्रत्येक गोष्टीवर व्यक्त झालं पाहिजे मूर्खपणे पाहणे किंवा ऐकू नये. पत्रकार जोपर्यंत गप्पा आहे तोपर्यंत समाजही गप्प असेल. देशातील 90% मीडिया भांडवलदारांच्या ताब्यात आहे. बीड येथील एकाधिकारशाही केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर लोकशाहीसाठी आणि समाजासाठी ही मारक आहे.''
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद यांनी केले तर मराठवाडा विभागप्रमुख सुभाष चौरै यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा