World Cup 2023 : रोहित च्या नेतृत्वात अर्जुनचीवनडे वर्ल्डकपसाठी निवड



 ब्युरो टीम : भारतीय संघांचे यंदाच्या वर्षीचं शेड्यूल हे फारच बिझी आहे. आयपीएलनंतर  आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकपसाठी देखील तयार रहायचं आहे. सध्या तरी वनडे वर्ल्डकपसाठी एकून 8 टीम्स क्वालिफाय झाल्या आहेत. यामध्ये 2 टीम अजून क्वालिफाय व्हायच्या असून 18 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर सामने खेळवले जातात. यामध्ये अजून कोणत्या टीम क्वालिफाय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या सामन्यांसाठी एकूण 10 देशांचा समावेश असून यामध्ये नेपाळ  देशंही समाविष्ट आहे. दरम्यान नेपाळ क्रिकेट बोर्डाने क्वालिफायर सामन्यांसाठी 16 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. दरम्यान या टीममध्ये अर्जुनच्या नावाचाही समावेश आहे. 

नेपाळच्या टीममध्ये अर्जुनचं सिलेक्शन

झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या क्वालिफायर सामन्यांसाठी नेपाळची टीम सहभागी होणार आहे. 18 जूनपासून हे सामने खेळवण्यात येणार आहेत. नेपाळ क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी 16 सदस्यांच्या टीमची घोषणा केली असून यामध्ये अर्जुन सऊदला ( Arjun Saud ) संधी मिळाली आहे. 

जर नेपाळची क्रिकेट टीम   वर्ल्ड कप 2023 साठी क्वालिफाय झाली तर तिला भारताविरूद्ध सामना खेळावा लागणार आहे. अर्जुन हा नेपाळ क्रिकेट टीमचा विकेटकीपर फलंदाज असून चाहते त्याला धोनीच्या नावाने संबोधित करतात. 

कसे असतील क्वालिफायरचे सामने

क्वालिफायर फेरीत एकूण 10 टीम सहभागी होणार असून, या टीमची 2 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आलीये. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, अमेरिका आणि नेपाळ या टीम्स ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, स्कॉटलंड, आयर्लंड, ओमान आणि यूएई या देशांचा समावेश आहे. 

क्वालिफायर सामन्यांसाठी नेपाळची टीम

रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुर्तेल, ज्ञानेंद्र मल्ल, कुशल मल्ल, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, भीम शर्की, प्रतीश जीसी, ललित रंबीशी, अर्जुन सउद, किशोर महतो, सोमपाल कामी, आरिफ शेख,करण केसी, संदीप लामिछाने

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने