Yash : यशने नाकारला रामायण चित्रपट, ऑफर झाली होती रावणाची भूमिका



ब्युरो टीम : गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. तर सध्या रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ची सर्वत्र चर्चा आहे. अशातच काही दिवसांपूर्वी नितेश तिवारी यांनीदेखील ‘रामायणा’वर आधारित चित्रपटाची घोषणा केली. परंतु आता या चित्रपटाच्या बाबतीत एका साऊथ सुपरस्टारने मोठा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार यशला विचारणा करण्यात आली होती. मात्र एका खास कारणाने त्याने या चित्रपटाला नकार दिला आहे.

‘रामायण’ चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आल्यावर यश या चित्रपटात ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक होता. ही भूमिका साकारणं त्याच्यासाठी अधिक चॅलेंजिंग असणार होतं. मात्र त्याच्या टीमने ही भूमिका न साकारण्याचा सल्ला त्याला दिला आणि यशला त्यांचं म्हणणं पटलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “मला माझ्या चाहत्यांच्या भावना जाणून घेणं अधिक महत्त्वाचं वाटत आहे. ते माझ्या बाबतीत जास्त संवेदनशील आहेत आणि जर मी त्यांच्या इच्छेविरुद्ध एखादं काम केलं तर मला विविध प्रतिक्रिया ते देतात.”

कौतुक करीत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटात रावणाची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. लवकरच या चित्रपटाबद्दल अधिक माहिती समोर येईल असं बोललं जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने