ब्युरो टीम : महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हा 2024 ची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत तो समाजवादी पार्टीच्या तिकिटावर अलाहाबादमधून निवडणूक लढवू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
परंतु अद्याप याला अभिषेक बच्चन किंवा समाजवादी पार्टीकडून दुजोरा मिळालेला नाही.
2024 च्या निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. अभिषेक बच्चन हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमधून निवडणूक लढवली व ते निवडूनही आले होते. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधून अभिषेक आपली राजकीय कारकीर्द सुरू करू शकतो. अभिषेक बच्चनची आई जया बच्चन या सपाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्यांचे कुटुंब हे समाजवादी विचारधारेचे मानले जाते. त्यामुळे अभिषेक बच्चन हा सपाकडून निवडणूक लढवू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा