Agriculture : 'या' जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता? प्रशासनाने घेतला मोठा निर्णय



विक्रम बनकर, नगर : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच सद्यस्थितीत अहमदनगर जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून येणाऱ्या काळात जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 

जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3041022 में टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 3.8 महिने पुरेल. चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्हयात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असुन  हा आदेश पुढील दोन महिन्याच्या कालावधीकरीता लागू राहणार आहे. अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सुनील तुंबारे यांनी ही माहिती दिली आहे.

पहा नेमकं काय म्हणाले डॉ. सुनील तुंबारे



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने