Ajit पवार : अजित पवारांनी घेतली shide-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ, सोबत 30 आमदारचा पाठिंबा



ब्युरो टीमशिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडली आहे. राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-भाजप सत्तेबराेबर गेले आहेत. राजभवनावर रविवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात माेठी खळबळ उडाली आहे.

राज्याचे नेते अजित पवार यांच्याबराेबर राष्ट्रवादीमधील नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, धर्मराव आश्राम, संजय बनसाेडे, हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी साेहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत.

अजित पवार हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज हाेते. त्याची परिणिती आता फुटीत झाली. या शपथविधी साेहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीमधील 30 आमदार, खासदार हे अजित पवार यांच्याबराेबर आहेत

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने