ब्युरो टीम :आशिया कपसाठी (Asia Cup 2023) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून पुण्याचा आणि सीएसकेचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड याची नियुक्ती करण्यात आली असून रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग यांना भारताचा पहिला कॉल-अप मिळाला आहे.
बीसीसीआयने यापूर्वी जाहीर केले होते, की आशिया कपसाठी संघात विश्वचषक स्पॉटसाठी दावा मांडणारे खेळाडूंचा विचार करण्यात येणार नाही. ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, स्टार खेळाडू विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्यासह सर्व वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात आले.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे केले जाईल असे चिन्ह दिसत होते. परंतु, बीसीसीआयने गायकवाडला संघाचा कर्णधार म्हणून संधी देत भविष्याकडे पाहण्याचा निर्णय घेतला आहे, असे क्रिकेट समर्थकांचे अनुमान आहेत.
यावेळी राहुल त्रिपाठी, यशस्वी जैस्वाल आणि टिळक वर्मा ह्या युवा फलंदाजांनाही संधी देण्यात आली आहे. जैस्वाल आणि टिळक या दोघांनी आधीच वेस्ट इंडिज मालिकेसाठी स्वतःचा पहिला T20I कॉल-अप मिळवला आहे.
रिंकू, जितेश शर्मा आणि त्रिपाठी हे आशिया कपमध्ये जागा (Asia Cup 2023 ) मिळण्यासाठी सक्षम होते. हे जेव्हा त्यांना वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताच्या T20I संघात स्थान देण्यात आले तेव्हा स्पष्ट झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा