Asia Cup India Vs Pakistan | भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट राखून दणदणीत विजय; साई सुदर्शन-राजवर्धन हंगरगेकर विजयाचे शिल्पकार



ब्युरो टीम : इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत-A संघाने पाकिस्तान-A संघावर 8 गडी राखून सहज विजय मिळवला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलच्या ग्रुप-बीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर काल खेळला गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला (India Vs Pakistan) पाणी पाजले आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने आठ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. इमर्जिंग आशिया चषक 2023 (Asia Cup ) मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. पाकिस्तान-अ ने नाणेफेक जिंकून भारत-अ विरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचे नेतृत्व यश धुलकडे आहे, तर पाकिस्तानची कमान मोहम्मद हरिसकडे आहे. भारताच्या मानव सुथारने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने पाकिस्तानच्या डावातील 23व्या षटकात कामरान गुलाम आणि हसिबुल्ला खान यांना बाद केले. यानंतर त्याने 27 व्या षटकात मोहम्मद हरीसला 14 धावांवर धावा करायला लावल्या. तर हंगरगेकरनेसुद्धा चांगली गोलंदाजी करीत 5 विकेट घेत सामन्यात पाकिस्तानला रोखून धरले. पाकिस्तानने निर्धारित षटकांच्या आतच 205 धावांवर ऑल आऊट झाला. 

साई सुदर्शन-राजवर्धन हंगरगेकर विजयाचे शिल्पकार

दरम्यान, या सामन्यात साई सुदर्शन याचे दमदार शतक आणि राजवर्धन हंगरगेकर याच्या पाच विकेटच्या बळावर भारत-अ संघाने पाकिस्तान-अ संघाचा पराभव केला. तुळजापूरचा असलेला राजवर्धन हंगरगेकर याने पाच विकेट घेत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत-A संघाने पाकिस्तान-A संघावर 8 गडी राखून सहज विजय मिळवला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलच्या ग्रुप-बीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. या सामन्यात साई सुदर्शन-राजवर्धन हंगरगेकर विजयाचे शिल्पकार ठरले.

भारताची विजयाची हॅटट्रिक

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने याआधी यूएई आणि नेपाळलवर विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना साई सुदर्शन याने दमदार शतक झळकावले. पाकिस्तानने दिलेले 206 धावांचे आव्हान भारताने 8 विकेट राखून सहज पार केले. साई सुदर्शन याने विजयी षटकार लगावला. साई सुदर्शन याने नाबाद 104 धावांची खेळी केली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने