Avinash sabale : अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र,



ब्युरो टीम : स्टिपलचेस प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. Silesia Diamond League मध्ये अविनाश साबळेने सहावं स्थान पटकावत ऑलिम्पिकचं स्थान निश्चीत केलं आहे.पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवणारा अविनाश हा पहिला track athlete ठरला आहे.

२८ वर्षीय अविनाश साबळेने ८:११:६३ मिनीटांत ही शर्यत पूर्ण केली. पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी ८:१५:०० हा निकष नक्की करण्यात आला होता. मोरोक्कोचा चॅम्पिअन अल-बकाली सुफेनने डायमंड लिग स्पर्धा जिंकली. सुफेनने ८:०३:१६ मिनीटात ही शर्यत पूर्ण केली. केनियाच्या अब्राहम किबीवोटने ८:०८:०३ मिनीटात शर्यत पूर्ण करत दुसरं तर लिओनार्ड किपकेमोई बेटने ८:०९:४५ मिनीटात शर्यत पूर्ण करत तिसरं स्थान पटकावलं.

पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवणारा अविनाश साबळे हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. अविनाश साबळेची यंदाच्या वर्षातली ही तिसरी Diamond League ठरली आहे. वेळेच्या निकषात अविनाश साबळेची ही सर्वोत्तम वेळ ठरली आहे. मोरोक्कोच्या रबात येथे झालेल्या स्पर्धेत अविनाश दहावा, स्टॉक्लोहम येथे झालेल्या शर्यतीत अविनाश पाचव्या स्थानावर राहिला होता.

हंगेरी येथील बुडापेस्ट येथे १९ ते २७ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअनशीपसाठी अविनाश साबळे याआधीच पात्र ठरला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने