Bachhu kadu : बच्चू कडू मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, पण...; सरकारमध्ये राहण्याबाबतही स्पष्ट केली भूमिका

 


ब्युरो टीम : मंत्रिपदावरुन अस्वस्थ असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही, हे स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, आता त्यांचा निर्णय झाला असून आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. कडू म्हणाले, खरंतर गेले पाच वर्षे तुम्ही मला या सरकारमध्ये पाहत आहात. यासाठी मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं.

त्यानंतर जे काही नवीन समीकरणं जुळायला लागले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालय स्थापण्याबाबत मागणी केली होती. पण ते काही झालं नाही जर ते झालं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची गरज पडली नसती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. देशात पहिल्यांदाच असं मंत्रालय तयार झालं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने