Bai pan bhari deva : 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे..


ब्युरो टीम : बाईपण भारी देवा  हा २०२३ चा केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ मीडिया निर्मित भारतीय मराठी -भाषा नाटक चित्रपट आहे. यात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या कुलकर्णी (Sukanya Kulkarni), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), दीपा परब (Deepa Parab) हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक (Director) केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन १ महिना झाला तरी अनेकांना या चित्रपटाचं वेड (craze) आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर (Social media) या चित्रपटातील डायलॉग्स (Dialogues) आणि त्याचसोबत गाणी (songs) व्हायरल (Viral) होत असल्याचे आपण पाहतो. सगळीकडे सोशल मीडियावर फक्त 'बाईपण भारी देवा' आपल्याला पाहायला मिळतयं. या चित्रपटानं सगळ्यांची फक्त मने जिंकली नाही तर त्यासोबत चित्रपटानं एक वेगळा रेकॉर्ड (record) केला आहे. आधीच चित्रपटानं कोट्यावधींची कमाई केली असताना, त्यानं बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) या चित्रपटाला मागे टाकत एक नवा रेकॉर्ड केला आहे.

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट थिएटरमध्ये असताना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा देखील चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कमाई केली असली. तरी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर त्याचा कोणताही फरक पडला नाही. इतकंच नाही तर हा चित्रपट देखील आपले प्रेक्षक खेचून घेऊन जाऊ शकला नाही. यानंतर नुकताच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानं भारतभर चांगली कमाई केली असली तरी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना इतक्या सोप्या पद्धतीनं खेचून घेऊ शकला नाही. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीला फक्त ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने