मुलीच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत फॅन व पुस्तकांचे वाटप - सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. महेंद्र मिसाळ यांचा उपक्रम

 


ब्युरो टीम : आजकाल वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, फटाके वाजवणे, आलिशान हॉटेलात पार्ट्या असे प्रकार आपण नेहमीचं सर्रास पाहतो. अफाट खर्च करत मौजमजा केली जाते. पण काही लोक वाढदिवसा निम्मित विनाकारण खर्चाला फाटा देत समाजपयोगी उपक्रम राबवताना दिसतात. आपण समाजाचे घटक आहोत व समाजासाठी काहीतरी केले पहिजे या हेतुने लोक कार्य करत असतात.

श्रीगोंदा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्रा. महेंद्र मिसाळ सर यांची मुलगी श्रावणी हिचा २६ जुलैला वाढदिवस असतो. या वर्षी वाढदिवसानिमित्त त्यांनी श्रावणी शिकते त्याच जि. प. शाळेस वॉलफॅनचे वाटप केले. त्यांनी  स्वःता लिहलेले "क्रांतिज्योती" पुस्तकाचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी श्रावणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने