Buldhana Bus Accident : अजित पवारांचा मोठा निर्णय!; बुलढाण्यातील भीषण बस अपघातानंतर

 



ब्युरो टीम: नागपूरहून पुण्यात येत असताना एका खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा भीषण प्रकार घडला आहे. या अपघातानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांनी अपघाताच्या घटनेमुळे पुण्यातील कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. तसेच अपघात स्थळी भेट देण्यासाठी अजित पवार जाण्याची शक्यता देखील आहे. त्यांना विमान उपलब्ध होत नसल्यामुळे जाण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवरा, उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व बड्या नेत्यांनी बुलढाणा येथे झालेल्या या अपघतावर शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी पुण्यातील सदाशीव पेठ येथे क्रांती अग्रणी अभ्यासिकेचे उद्घाटन होणार होते. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर आजित पवारांचे फ्लेक्स देखील सदाशीव पेठ परिसरात लावण्यात आले होते, तसेच मंडप देखील उभारण्यात आला होता.
सकाळी दहा वाजता होणाऱ्या उद्घाटनासाठी सगळे हजर झाले असताना अजित पवारांकडून साडेनऊ वाजता ते येणार नसल्याचा निरोप देण्यात आला. अजित पवारांचा शनिवारचा पुणे दौराच रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नेमकं झालं काय?
नागपूरहून पुण्यात येत असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने