Chagan bhujbal : मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू - मंत्री छगन भुजबळ

 

ब्युरो टीम : लासलगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काळात आला. कृषी, पर्यटन, शिक्षण, धार्मिक, पाणी पुरवठा, उद्योग, पायाभूत सुविधा, जलसिंचन यासह विविध विकासाची अनेक कामे आपण केली आहे. यापुढील काळातही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदी छगन भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सायगाव येथील धनदाई लॉन्स येथे नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सभापती संजय पवार, प्रा.अर्जुन कोकाटे, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, अशोक कुळधर, ॲड.राहुल भालेराव, अनिल दारुंटे, रघुनाथ खैरनार, संतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,राज्यातील महत्वाच्या शहराप्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या व मतदार संघाच्या विकासासाठी आपण अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण सरकार मध्ये सामील झालो आहे. विकासाची लढाई आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मांजरपाडा सारखा महत्वाचा प्रकल्प मार्गी लावला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढवा यासाठी लवकरच काही वळण योजना मार्गी लागल्या जाणार आहे. त्यामुळे येवलेकराना त्याचा अधिक फायदा होणार आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच अनुदान लवकरच वर्ग करण्यात येईल असे सांगत गावकऱ्यांनी केलेल्या नागरी सत्कराबाबत त्यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने