Chhagan bhujbal: विठ्ठला, आम्हा साऱ्यांना सांभाळून घे…; छगन भुजबळ यांची शरद पवार यांना गळ

 


ब्युरो टीम : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी अचानकपणे अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्री या ठिकाणी आले. शरद पवार यांची अचानकपणे भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात चर्चा होत आहे. 

मंत्री छगन भुजबळ हे जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचले तेव्हा त्यांनी शरद पवार यांना विनंती केली. विठ्ठला आम्हा साऱ्यांना सांभाळून घे…, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना गळ घातली.

दरम्यान, अजित पवार गटांकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांनी या सगळ्याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने