Delhi Bill : दिल्ली अध्यादेश राज्यसभेत पास होणे पक्के! मोदी सरकारला YSR काँग्रेसची साथ



 ब्युरो टीम :मागील अनेक दिवसांपासून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्ली विधेयक पास होऊ नये, यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मोदी सरकारसाठी दिल्ली विधेयक मंजूर करून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून मोदी सरकारला वायएसआर काँग्रेसचे समर्थन मिळाले आहे.

दिल्ली विधेयकावर मोदी सरकारला वायएसआर काँग्रेसचे समर्थन मिळाले आहे. वायएसआर काँग्रेसचे संसदेतील नेते व्ही. विजयसाई रेड्डी यांनी सांगितले की त्यांचा पक्ष मोदी सरकारच्या पाठीशी उभा आहे. दिल्लीशी संबंधित अध्यादेश विधेयकावर आम्ही केंद्र सरकारच्या बाजूने आहे. त्याचबरोबर आम्ही मोदी सरकारविरोधात आणल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावालाही विरोध करणार आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभेत नऊ खासदार आहेत. 

व्ही. विजयसाई रेड्डी म्हणाले, "आम्ही दोन्ही मुद्द्यांवर सरकारच्या बाजूने मतदान करणार आहोत. आता वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्याने, राज्यसभेत दिल्ली विधेयक मंजूर होणे निश्चित झाले आहे. याशिवाय वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत 22 खासदार आहेत, जे अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करतील.

याआधी राज्यसभेत दिल्ली विधेयकाच्या बाजुने मोदी सरकारकडे ११२ खासदार होते. सरकार बहुमतापासून ८ ने मागे होते. मात्र आता वाएसआर काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकारचा आकडा १२१ वर जाणार आहे. जो बहुमताच्या आकड्यापेक्षा एकने अधिक आहे. सरकारला बीएसपी, जेडीएस आणि टीडीपीसकडून समर्थनाची अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने