Devendra Fadnavis : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...



ब्युरो टीम : महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असे दावे सातत्याने केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नेतेही अशी वक्तव्ये करत आहेत. मात्र आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते असून तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटतं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगं काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना वाटू शकतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या पक्षातील लोकांना भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटू शकतं. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने