ब्युरो टीम : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. टीम इंडिया लवकरच विंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज आणि 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेने वेस्ट इंडिज दौऱ्याची सांगता होणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वनडे सीरिजसाठी 23 जूनला भारतीय संघ जाहीर केला आहे. आता या दौऱ्याआधी टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटर दिनेश कार्तिक याने मोठं विधान केलं आहे.
दिनेश कार्तिक गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. कार्तिकने अखेरचा टी 20 सामना हा 2 नोव्हेबंर 2022 रोजी खेळला होता. तर कार्तिकला अखेरचा कसोटी आणि वनडे सामना खेळून 3 वर्षांपेक्षा अधिक वेळ झाली आहे. मात्र दिनेश कार्तिक आगामी विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. कार्तिकने याआधी मोठं विधान केलं आहे.
दिनेश कार्तिक काय म्हणाला?
दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. मी विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे, असं कार्तिकने म्हटलंय. “मी तामिळनाडू्च्या निवड समितीला विजय हजारे ट्रॉफी निवडीसाठी उपलब्ध असेन, याची माहिती देणार आहे. मी या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सूक आहे.”, असं स्पोर्टस्टारने दिनेश कार्तिकच्या हवाल्याने म्हटलंय
इतकंच नाही, तर दिनेश कार्तिक याला विजय हजारे ट्रॉफीसह सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही खेळायचंय. या दोन्ही स्पर्धेत खेळल्याने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सराव होईल, असं कार्तिकने म्हटलं. “मला दोन्ही व्हाईट बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळायचंय. जेणेकरुन आयपीएलच्या दृष्टीकोनातून तयारी होईल”, असंही कार्तिकने स्पष्ट केलं.
दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं यंदा भारतात आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिक कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसू शकतो. दिनेश कार्तिकने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये कॉमेंट्री केली होती
टिप्पणी पोस्ट करा